कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -
कोपरगाव शहरासह तालुक्यात 24 एप्रिल रोजी सापडलेल्या 226 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 30 तर खासगी लॅब मधील 11 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 32 असे 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
तर तालुक्यातील करंजी येथील 78 वर्षीय पुरुष, माहेगाव देशमुख येथील 65 वर्षीय महिला तर शहरातील लक्ष्मीनगर येथील 45 वर्षीय महिला या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 73 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील खडकी येथील 2, शारदानगर येथील 3, कोपरगाव येथील 2, समतानगर येथील 2, बेट येथील 1, तेलीगल्ली येथील 1, सुभद्रानगर येथील 1, निवारा येथील 4, साईनगर येथील 2, साईसिटी येथील 1, ओमनगर येथील 1, जिजामाता उद्यान येथील 1, येवला रोड येथील 1 तर ग्रामीण मधील येसगाव येथील 1,
जे. पाटोदा येथील 1, माहेगाव देशमुख येथील 3, दहेगाव बोलका येथील 1, धामोरी येथील 1, पोहेगाव येथील 3, कारवाडी येथील 2, सुरेगाव येथील 2, देर्डे कोर्हाळे येथील 1, धारणगाव येथील 7, शिंगणापूर येथील 1, कोकमठाण येथील 3, तिनचारी येथील 1, वारी येथील 1, संवत्सर येथील 1, कोळपेवाडी येथील 1, मळेगाव थडी येथील 2, ब्राम्हणगाव येथील 4, रवंदे येथील 3, साकरवाडी येथील 1 असे आज दिवसभरात 73 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. कोपरगाव तालुक्यात आज 25 एप्रिल पर्यंत 8 हजार 157 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून सहा हजार 984 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1145 अॅक्टिव पेशंट आहे आज पर्यंत 31 हजार 405 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्यांची 22.08 टक्के आहे. मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 115 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.