कोपरगावात 147 करोना पॉझिटिव्ह रूग्ण

कोपरगावात 147 करोना पॉझिटिव्ह रूग्ण

दोघांचा मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) - कोपरगाव शहरासह तालुक्यात 22 एप्रिल रोजी सापडलेल्या 112 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 52 तर खासगी लॅब मधील 19 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 46 असे 147 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर कोपरगाव तालुक्यातील धमोरी येथील 70 वर्षीय पुरुष तर चांदवड येथील 61 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 147 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. कोपरगाव तालुक्यात आज 23 एप्रिल पर्यंत सात हजार 858 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून सहा हजार 784 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1046 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत ऐकून 31 हजार 106 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 107 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com