कोपरगावात करोनाबळींची शंभरी पार

आज 8 मृत्यू
कोपरगावात करोनाबळींची शंभरी पार

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 21 एप्रिल रोजी सापडलेल्या 133 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 55 तर खासगी लॅब मधील 33 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या

अहवालांपैकी 24 असे 112 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर कोपरगाव येथील कृषिमित्र नगर येथील 75 वर्षीय महिला, कोपरगाव येथील 46 वर्षीय दोन पुरुष, निवारा येथील 67 वर्षीय महिला, खडकी येथील 65 वर्षीय पुरुष, आपेगाव येथील 73 वर्षीय महिला, रवंदे येथील 62 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला या आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 112 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तालुक्यात आज 22 एप्रिल पर्यंत ऐकून 7 हजार 711 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 6 हजार 602 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1081 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. आज पर्यंत 30 हजार 959 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के अआहे. तर 105 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com