कोपरगावात 130 करोना पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू
कोपरगावात 130 करोना पॉझिटिव्ह

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 15 एप्रिल रोजी सापडलेल्या 189 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 105 तर खासगी लॅब मधील 19 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 6 असे 130 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

तर शहरातील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 130 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 6, हनुमान नगर येथील 2, निवारा येथील 2, लक्ष्मी नगर येथील 2, गोरोबा नगर येथील 1, रिद्धी सिद्धी नगर येथील 2, बालाजी नगर येथील 1, खडकी येथील 3, साई सीटी येथील 3, आढाव वस्ती येथील 1, मोहिनीराज नगर येथील 1, ब्राम्हण गल्ली येथील 4, बागुल वस्ती येथील 2, लक्ष्मी नगर येथील 2, मातोश्री नगर येथील 1, ओम नगर येथील 1, कोजागिरी कॉलनी येथील 1, सराफ बाजार येथील 2, ईशान नगर येथील 1, शिवाजी रोड येथील 1, विवेकानंद नगर येथील 1,

कापड बाजार येथील 1, तर ग्रामीण मधील शिरसगाव येथील 1, संवत्सर येथील 5, माहेगाव देशमुख येथील 3, चांदेकसारे येथील 2, मूर्शतपूर येथील 2, गोधेगाव येथील 4, कोळपेवाडी येथील 2, दहेगाव बोलका येथील 9, ब्राम्हणगाव येथील 4, कुंभारी येथील 1, टाकळी येथील 10, मंजूर येथील 1, चासनळी येथील 3, वेळापूर येथील 2, सडे येथील 3, वारी येथील 1, रवंदे येथील 13, धारणगाव येथील 2, येसगाव येथील 1, देर्डे कोर्‍हाळे येथील 4, घारी येथील 2, काकडी येथील 1, करंजी येथील 4, पढेगाव येथील 2, भोजडे येथील 1, मळेगाव थडी येथील 1 असे 130 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. तालुक्यात 16 एप्रिल पर्यंत 6 हजार 903 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून पाच हजार 681 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1140 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 30 हजार 137 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 75 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com