कोपरगाव तालुक्यात नवीन 189 करोना पॉझिटिव्ह

76 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू
कोपरगाव तालुक्यात नवीन 189 करोना पॉझिटिव्ह

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 14 एप्रिल रोजी सापडलेल्या 145 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड

टेस्ट करण्यात आली त्यात 103 तर खासगी लॅब मधील 46 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 40 असे ऐकून 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

तर शहरातील कोर्ट रोड येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसात एकूण 198 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 8, येवला रोड येथील 1, गजानन नगर येथील 3, दत्त नगर येथील 1, ओम नगर येथील 4, मोहिनीराज नगर येथील 2, लक्ष्मी नगर येथील 3, इंदिरा नगर येथील 1, ब्रिजलाल नगर येथील 1, काले मळा येथील 1, साईसिटी येथील 2, शिवाजी रोड येथील 4, जिजाऊ पार्क येथील 1, अंबिका चौक येथील 1, अंबिका नगर येथील 4, शारदा नगर येथील 1, निवारा येथील 7, बाजार तळ येथील 1, श्रद्धा नगर येथील 1, आंबेडकर नगर येथील 2, रेणुका नगर येथील 1, पांडे गल्ली येथील 4, अन्नपूर्णा नगर येथील 3, बेट येथील 1, गांधीनगर येथील 1, विवेकानंद नगर येथील 2, सराफ बाजार येथील 1, बागुल वस्ती येथील 1, इंदिरा पथ येथील 2, शिक्षक कॉलनी येथील 1, स्वामी समर्थ नगर येथील 2, सह्याद्री कॉलनी येथील 1, गिरमे चाळ येथील 2 तर ग्रामीण मधील कोकमठाण येथील 5, जे. कुंभारी येथील 1, रवंदे येथील 1 , मूर्शतपूर येथील 4, शिंगणापूर येथील 3, टाकळी येथील 1, माहेगाव देशमुख येथील 6, चांदेकसारे येथील 5, माळवाडी येथील 2, गोदावरी मिल्क येथील 1, पुणतांबा येथील 2, बक्तरपूर येथील 2, सांगावी भुसार येथील 1, वेळापूर येथील 3, कोळपेवाडी येथील 3, चासनळी येथील 4, सुरेगाव येथील 1, हांडेवाडी येथील 6, धामोरी येथील 3, मंजूर येथील 1, कान्हेगाव येथील 1, सडे येथील 2, वारी येथील 2, कुंभारी येथील 3, ब्राम्हणगांव येथील 5, टाकळी येथील 4, येसगाव येथील 3, धारणगाव येथील 2, तीन चारी येथील 1, खिर्डी गणेश येथील 2, पोहेगाव येथील 1, मढी येथील 1, संवत्सर येथील 5, दत्त वाडी येथील 1, कासली येथील 1, दहेगाव येथील 4, गोधेगाव येथील 1, पढेगाव येथील 2, मनेगाव येथील 1, कान्हेवाडी येथील 1, जेऊर पाटोदा येथील 1, औद्योगिक वसाहत येथील 2, मळेगाव थडी येथील 3, सोनारी येथील 1, साकरवाडी येथील 2 असे 189 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. तालुक्यात आज 15 एप्रिल पर्यंत 6 हजार 773 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून पाच हजार 519 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1172 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 30 हजार 7 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 74 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com