कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) | Kopargaon -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 6 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 47 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 107 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात

काल 11 रुग्ण तर अहमदनगर येथे पाठवलेल्या स्राव पैकी 26 रुग्ण तसेच खासगी लॅब मधील 4 रुग्ण असे एकूण दिवसभरात 41 जण करोना बाधित आढळून आले आहे. तर 96 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले आहे. शहरातील गजानन नगर येथील 59 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील कोकमठाण येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात काल पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णामध्ये शहरातील सराफ बाजार येथील 47 वर्षीय पुरुष , येवला रोड येथील 38 वर्षीय पुरुष , कर्मवीरनगर येथील 27 वर्षीय पुरुष, रिद्धीसिद्धीनगर येथील 50 वर्षीय महिला , मोहिनीराज नगर येथील 62,14 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील 14 वर्षीय मुलगा तर 36,35,20 वर्षीय महिला, इशांतनगर येथील 32 वर्षीय पुरुष तर 27 वर्षीय महिला , धारणगाव रोड येथील 30 वर्षीय पुरुष, भारत प्रेस रोड येथील 15 वर्षीय पुरुष तर 19 वर्षीय महिला , गांधीनगर येथील 65 वर्षीय पुरुष, राजपाल सोसायटी 21 वर्षीय पुरुष, श्रद्धानगर येथील 57 वर्षीय महिला , इंगळे नगर येथील 56 वर्षीय पुरुष , स्वामीसमर्थ नगर येथील 59 वर्षीय पुरुष, अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळ 29 वर्षीय पुरुष, खडकी येथील 35 वर्षीय पुरुष असे शहरात 22 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत . तर ग्रामीण भागात कोकमठाण येथील 57,65 वर्षीय पुरुष तर 35,45 वर्षीय महिला , शिंगणापूर येथील 30,13 वर्षीय महिला , येसगाव येथील 27 वर्षीय पुरुष , वेस येथील 24 वर्षीय महिला , संवत्सर येथील 57 वर्षीय पुरुष , कोळपेवाडी येथील 73,30 वर्षीय पुरुष , सुरेगाव येथील 36,18 वर्षीय महिला , चास नळी येथील 26,37,56 वर्षीय पुरुष तर 56 वर्षीय महिला , खिर्डी गणेश येथील 58 वर्षीय पुरुष , देर्डे चांदवड येथील 58 वर्षीय पुरुषाचा सामावेश आहे. तसेच काल 6 रुग्णांनी करोनावर मात केल्यानेे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात काल दि. 7 सप्टेंबर पर्यंत एकूण 1 हजार 92 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यातील 171 रुग्ण अॅक्टिव्ह तर 901 रुग्ण बरे झाले आहे. आज पर्यंत ऐकून 4 हजार 818 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. 20 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.