घाटशिरसमध्ये करोनाचा उद्रेक

घाटशिरसमध्ये करोनाचा उद्रेक

सर्वाधिक 50 रुग्ण : कन्टेन्मेंट झोन घोषित

तिसगाव (वार्ताहर) -

पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून गावात सध्याच्या परिस्थितीत 50 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याने हे गाव आता तालुका प्रशासनाने कॅन्टेन्मेंटझोन म्हणून जाहीर केले आहे.

दरम्यान, गावात आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी करोना तपासणी चाचणीचा कॅम्प घेण्यात आला. यामध्ये 50 नागरिकांची करोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांना तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले, असल्याची माहिती सरपंच गणेश पालवे व विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी दिली. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच पालवे यांनी केले आहे.

घाटशिरस येथे प्राथमिक आरोग्य केंद्रच्यावतीने घेण्यात आलेल्या करोना चाचणी कॅम्पमध्ये आरोग्य सेविका स्नेहल पालवे, वैदय, आरोग्यसेवक कांबळे, सईद डफेदार, ग्रामसेविका सुवर्णा भापकर, ग्रामपंचायत कर्मचारी विजय शिंदे, गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, राजू पळसकर, प्रवीण तुपे, लक्ष्मीकांत अकोलकर सहभागी झाले होते.

घाटशिरस मधील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने गावातच ग्रामस्थांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्याची व्यवस्था करावी, ग्रामपंचायत त्याकरिता सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे सरपंच गणेश पालवे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com