संगमनेर, पारनेर, शेवगाव अन् कर्जतमध्ये करोनाचे शतक

एक हजारांहून अधिक बाधित वाढले : सक्रीय पाच हजारांवर : 30 बळी
संगमनेर, पारनेर, शेवगाव अन् कर्जतमध्ये करोनाचे शतक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar -

जिल्ह्यात (Ahmednagar District) शनिवारी 1 हजार 388 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Hospital Discharge) देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 87 हजार 696 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 1 हजार 50 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 5 हजार 319 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आणखी 30 मृतांची नोंद करोना पोर्टलवर झाली असून एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 195 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 107, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 401 आणि अँटीजेन चाचणीत 442 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 4, जामखेड 1, नगर ग्रामीण 13, नेवासा 1, पारनेर 36, पाथर्डी 4, राहुरी 1, संगमनेर 16, शेवगाव 1, श्रीगोंदा 13, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 8, अकोले 8, जामखेड 77, कर्जत 80, कोपरगाव 16 नगर ग्रामीण 22, नेवासा 28, पारनेर 21, पाथर्डी 7, राहता 27, राहुरी 15, संगमनेर 89, शेवगाव 83, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 10 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 442 जण बाधित आढळून आले. मनपा 7, अकोले 36, जामखेड 14, कर्जत 46, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 19, नेवासा 10, पारनेर 80, पाथर्डी 27, राहता 10, राहुरी 21, संगमनेर 49, शेवगाव 48, श्रीगोंदा 31, श्रीरामपूर 23, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 111, अकोले 50, जामखेड 51, कर्जत 107, कोपरगाव 49, नगर ग्रामीण 127, नेवासा 10, पारनेर 149, पाथर्डी 120, राहता 45, राहुरी 82, संगमनेर 171, शेवगाव 118, श्रीगोंदा 137, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 1, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 37 अशा रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी करोनाबळींची संख्या 6 हजार 965 होती. त्यात शनिवारी 30 ने वाढ झाली असून यामुळे करोनाबळींची संख्या आता 6 हजार 195 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com