नगर जिल्ह्यात आज आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद

उपचारानंतर बरे झालेल्या 1352 जणांना डिस्चार्ज
नगर जिल्ह्यात आज आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद

अहमदनगर -

जिल्ह्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या1352 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 5 हजार 101 इतकी झाली आहे. करोना रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.08 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2654 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 14264 इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 651, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 582 आणि अँटीजेन चाचणीत 1421 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 118, अकोले 72, जामखेड 19, कर्जत 44, कोपरगाव 09, नगर ग्रामीण 30, नेवासा 07, पारनेर 45, पाथर्डी 36, राहता 30, राहुरी 11, संगमनेर 98, शेवगाव 28, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 36, कँटोन्मेंट बोर्ड 30, मिलिटरी हॉस्पिटल 07 इतर जिल्हा इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 298, अकोले 05, जामखेड 05, कर्जत 06, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 35, नेवासा 19, पारनेर 04, पाथर्डी 03, राहाता 81, राहुरी 14, संगमनेर 30, शेवगाव 02, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 25, कँटोन्मेंट बोर्ड 27 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत आज 1421 जण बाधित आढळुन आले.

मनपा 60, अकोले 68, जामखेड 09, कर्जत 112, कोपरगाव 275, नगर ग्रामीण 40, नेवासा 88, पारनेर 70, पाथर्डी 75, राहाता 104, राहुरी 126, संगमनेर 91, शेवगाव 62, श्रीगोंदा 85, श्रीरामपूर 139, कॅन्टोन्मेंट बोर्ड 14 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्येमनपा 568, अकोले 52, जामखेड 02, कर्जत 02, कोपरगाव 61, नगर ग्रामीण 90, नेवासा 17, पारनेर 10, पाथर्डी 45, राहाता 195, राहुरी 77, संगमनेर 97, शेवगाव 20, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 75, कॅन्टोन्मेंट 24 आणि मिलिटरी हॉस्पिटल 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या :

1,05,101उपचार सुरू असलेले रूग्ण : 14264

मृत्यू :1334

एकूण रूग्ण संख्या :1,20,699

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com