अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यात बुधवारी 174 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 72 हजार 943 इतकी

झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.29 टक्के इतके झाले आहे. बुधवारी रुग्ण संख्येत 176 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 898 इतकी झाली आहे.

दरम्यान बुधवारी करोनामुळे तिघाजणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 हजार 132 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्टलॅबमध्ये 49, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 114 आणि अँटीजेन चाचणीत 13 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये मनपा 18, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 7, पारनेर 6, शेवगाव 8, मिलिटरी हॉस्पिटल 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा 35, अकोले 5, कर्जत 3, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 3, पारनेर 3, पाथर्डी 5, राहाता 7, राहुरी 1, संगमनेर 31, शेवगाव 1, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 13 जण बाधित आढळून आले. मनपा 1, नेवासा 1, पारनेर 1, राहाता 3, राहुरी 6, श्रीगोंदा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.