करोना संसर्ग 15 हजारांच्या टप्प्यात

दहा मृत्यूंसह 650 नवे रुग्ण
करोना संसर्ग 15 हजारांच्या टप्प्यात

अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmednagar -

गेल्या महिनाभरापासून सुरू असणारा करोना संसर्गाने बोलता बोलता 15 हजारांचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 14 हजार 917 झाली असून बुधवारी जिल्ह्यात नव्याने 650 करोना रुग्ण आणि दहा मृत्यूची भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोना बळींची संख्या 191 झाली असून उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता पुन्हा 3 हजार 79 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 647 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 78.08 टक्के इतकी आहे.

बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 119, अँटीजेन चाचणीत 314 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 217 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 79 पाथर्डी 3, नगर ग्रामीण 17, भिंगार कॅन्टोन्मेंट 5, नेवासा 1, श्रीगोंदा 4, पारनेर 3, शेवगाव 1 आणि मिलिटरी हॉस्पिटल 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 314 जण बाधित आढळुन आले.

यामध्ये, मनपा 54, संगमनेर 17, राहाता 22, पाथर्डी 11, नगर ग्रामीण 60, श्रीरामपुर 29, भिंगार कँटोन्मेंट 8, नेवासा 7, श्रीगोंदा 16, पारनेर 13, राहुरी 7, शेवगाव 7, कोपरगाव 22, जामखेड 28 आणि कर्जत 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 217 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 131, संगमनेर 14, राहाता 8, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 20, श्रीरामपुर 8, कँटोन्मेंट 5, नेवासा 4, पारनेर 16, अकोले 3, राहुरी 4, जामखेड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी 522 सोडले

बुधवारी जिल्ह्यातील 522 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा 159, संगमनेर 38, राहाता 26, पाथर्डी 29, नगर ग्रामीण 48, श्रीरामपूर 14, कॅन्टोन्मेंट 8, नेवासा 25, श्रीगोंदा 15, पारनेर 27, अकोले 07, राहुरी 14, शेवगाव 35, कोपरगाव 15, जामखेड 26, कर्जत 35 मिलिटरी हॉस्पिटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगरच्या मानाच्या गणपतीचा अध्यक्ष पॉझिटिव्ह

नगर शहरातील मानाच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मानाच्या गणेश मंडळांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीला उपस्थित असणार्‍याचे धाबे दणाणले आहेत. आधल्या दिवशी बैठक अन् दुसर्‍या दिवशी आलेला पॉझिटिव्ह अहवाल यामुळे प्रमुख मंडळाचे प्रतिष्ठित पदाधिकारी चिंतेत आहेत. मानाच्या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनावर निर्णय घेण्यासाठी मानाच्या गणेश मंडळाची बैठक रविवारी नगरात झाली. शहरातील प्रतिष्ठित अन् मानाच्या मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 11 हजार 647

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3079

*मृत्यू 191

*एकूण रूग्ण संख्या 14 हजार 917

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com