नाशिक विभागात पावणे बारा हजार करोना बाधितांचा मृत्यू

उपसंचालक डॉ. गंडाळ यांची माहिती
नाशिक विभागात पावणे बारा  हजार करोना बाधितांचा मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी) - नाशिक महसूल विभागातून आजपर्यंत 8 लाख 66 हजार 287 रुग्णांपैकी 8 लाख 24 हजार 695 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 29 हजार 792 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 11 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.19 असून मृत्युदर 1.35 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 36 लाख 61 हजार 349 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 8 लाख 66 हजार 287 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. गंडाळ यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 59 हजार 783 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 लाख 45 हजार 42 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 11 हजार 629 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के इतका आहे. आजपर्यंत 3 हजार 173 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.19 टक्के.

...................

Related Stories

No stories found.