कोपरगावात पाच जणांचा करोनाने मृत्यू

89 नवीन रुग्णांची भर ; 1116 अ‍ॅक्टिव रुग्ण
कोपरगावात पाच जणांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) - कोपरगाव शहरासह तालुक्यात 12 मे रोजी सापडलेल्या 143 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 54 तर खासगी लॅब मधील 14 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 21 असे 89 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर तालुक्यातील पाच जणांचा करोनाने आज मृत्यू झाला आहे.

सांगावी भूसार येथील 72 वर्षीय पुरुष, सडे येथील 65 वर्षीय महिला, धारणगाव रोड येथील 79 वर्षीय पुरुष, ओम साई राम हाईट 69 वर्षीय पुरुष, तर मढी येथील 77 वर्षीय पुरुष या पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 89 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील कोपरगांव शहर येथील 5, साई नगर येथील 3, लक्ष्मी नगर येथील 3, वडांगळे वस्ती येथील 3, गजानन नगर येथील 2, समता नगर येथील 2, खडकी येथील 2, बँक कॉलनी येथील 1, बेट येथील 1, ओम नगर येथील 1, गांधी नगर येथील 1, धारणगाव रोड येथील 1,बंब प्लाझा येथील 1, गवारे नगर येथील 1 तर ग्रामीण मधील वारी येथील 6, कारवाडी येथील 4, कान्हेगाव येथील 4, गोधेगाव येथील 3, शिंगणापूर येथील 3, संवत्सर येथील 3, सांगावी भुसार येथील 3, मंजूर येथील 2, कोळपेवाडी येथील 2, येसगाव येथील 2, संजीवनी येथील 2,मूर्शतपूर येथील 2,

कोकमठाण येथील 2, चासनळी येथील 2, काकडी येथील 2, अंजनापूर येथील 1, वेळापूर येथील 1, वाळकी येथील 1, पोहेगाव येथील 1, वेस येथील 1, बोलकी येथील 1, सुरेगाव येथील 1, टाकळी येथील 2, रवंदे येथील 1, माहेगाव देशमुख येथील 1, मढी येथील 1, जे. पाटोदा येथील 1 असे 89 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. कोपरगाव तालुक्यात आज 13 मे पर्यंत 10 हजार 654 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 9 हजार 471 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1116 अ‍ॅक्टिव रुग्ण आहे. आज पर्यंत एकूण 43 हजार 170 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 24.10 आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.41 टक्के असे आहे. तर 163 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com