कोपरगावात 6 जणांचा करोनाने मृत्यू

157 नवीन रुग्णांची भर ; बळींचा आकडा 157 वर
कोपरगावात 6 जणांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 10 मे रोजी सापडलेल्या 201 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 93 तर खासगी लॅब मधील 37 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 28 असे 157 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर काल तालुक्यातील सहा जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

येसगाव येथील 68 वर्षींय महिला, माहेगांव देशमुख येथील 37 वर्षीय पुरुष, कोकमठाण येथील 45 वर्षीय पुरुष, टाकळी येथील 60 वर्षीय पुरुष, तिळवणी येथील 54 वर्षीय महिला तर शहरातील शिवाजी रोड येथील 35 वर्षिय महीला या सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल एका दिवसात एकूण 157 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 2, सप्तर्षी मळा येथील 2, खडकी येथील 3, लक्ष्मीनगर येथील 1, येवला रोड येथील 1, विवेकानंद नगर येथील 1, गजानन नगर येथील 1, संजय नगर येथील 1, निवारा येथील 2, बैलबाजार रोड येथील 1, वडांगळे वस्ती येथील 1, गणपती मंदिर येथील 2, दत्त नगर येथील 2, येवला रोड येथील 1, बेट येथील 3, हनुमान नगर येथील 1, ओम नगर येथील 1, अन्नपूर्णा नगर येथील 1 तर ग्रामीण मधील चांदगव्हाण येथील 2, रवंदे येथील 1, संजीवनी येथील 5,जे. पाटोदा येथील 2, अंबिका नगर येथील 1, मायगाव येथील 1, आत्मा मलिक येथील 1, रेल्वे स्टेशन येथील 5, चांदेकसारे येथील 5, पाथर्डी येथील 2, कारवाडी येथील 4, मंजूर येथील 2, वेळापूर येथील 6, चासनळी येथील 1, बक्तरपूर येथील 1, मळेगाव येथील 3, ब्राम्हणगाव येथील 1, नाटेगाव येथील 3, येसगाव येथील 5, मूर्शतपूर येथील 5, वेस येथील 1, अंजनापूर येथील 2, घारी येथील 1, जवळके येथील 3, वारी येथील 1, भोजडे येथील 2, कान्हेगाव येथील 2, धोत्रे येथील 3, दहिगाव येथील 1, सांगवी भुसार येथील 2, संवत्सर येथील 3, कासली येथील 1, उक्कडगाव येथील 1, सुरेगाव येथील 3, खिर्डी गणेश येथील 1, सोनारी येथील 1, रवंदे येथील 1, पढेगाव येथील 4, करंजी येथील 2,आंचलगाव येथील 1, धारणगाव येथील 1, रांजणगाव येथील 1 असे 157 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. कोपरगाव तालुक्यात आज 11 मे पर्यंत 10 हजार 422 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून आठ हजार 189 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1236 अ‍ॅक्टिव रुग्ण आहे तर आज पर्यंत 42 हजार 938 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 24.10 तर मृत्यू चे प्रमाण 1.41 टक्के आहे. आजपर्यंत 157 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com