बुधवारी कोपरगाव तालुक्यात तिघांचा करोनाने मृत्यू

दिवसभरात तालुक्यात 145 करोना पॉझिटिव्ह रूग्ण
 बुधवारी कोपरगाव तालुक्यात तिघांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 13 एप्रिल रोजी सापडलेल्या 181 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 132 तर खासगी लॅब मधील 13 असे 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर तालुक्यातील देर्डे चांदवड येथील 45 वर्षीय पुरुष, शहजापूर येथील 85 वर्षीय पुरुष आणि चासनळी येथील 50 वर्षीय महिला या तिघांचा मृत्यु झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 145 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 6, लक्ष्मी नगर येथील 2, बागुलवस्ती येथील 1, दत्त नगर येथील 1, स्वामी समर्थ नगर येथील 1, श्रद्धा नगर येथील 1, काले मळा येथील 1, खडकी येथील 3, ब्राम्हणगल्ली येथील 4, निवारा येथील 2, हनुमान नगर येथील 1, संभाजी नगर येथील 1, समता नगर येथील 1, ओम नगर येथील 2, मोहिनीराज नगर येथिल 3, रेणुका नगर येथील 3, ब्रिजलाल नगर येथील 2,

बालाजी नगर येथील 1, सह्याद्री कॉलनी येथील 1, यशवंत हौसिंग सो .येथील 1, इंदिरा पथ येथील 1, विवेकानंद नगर येथील 1, शिवाजी नगर येथील 1, येवला रोड येथील 1, तर ग्रामीण मधील करंजी येथील 27, पोहेगाव येथील 1, मूर्शतपूर येथील 1, जेऊर पाटोदा येथील 1, खिर्डी गणेश येथील 4, येसगाव येथील 1, टाकळी येथील 7, संवत्सर येथील 4, चांदेकसारे येथील 2, सुरेगाव येथील 4, हांडेवाडी येथील 5, शहाजापूर येथील 2, बक्तरपूर येथील 3, वडगाव येथील 3, वेळापूर येथील 1, मढी येथील 3, वारी येथील 5, धोत्रे येथील 1, खोपडी येथील 1, ब्राम्हणगाव येथील 7, सोनारी येथील 2, माहेगाव देशमुख येथील 3, कुंभारी येथील 1, देर्डे कोर्‍हाळे येथील 3, कोळपेवाडी येथील 1, सोनेवाडी येथील 1, दहेगाव येथील 2, वैजापूर येथील 1, पढेगाव येथील 2, लौकी येथील 1,

शिंगणापूर येथील 1, बोलकी येथील 1, चासनळी येथील 1 असे 145 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. कोपरगाव तालुक्यात 14 एप्रिल पर्यंत 6 हजार 584 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून पाच हजार 398 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1104 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 29 हजार 818 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे.तर 73 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com