कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 5 एप्रिल रोजी सापडलेल्या 130 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड

टेस्ट करण्यात आली त्यात 81 तर खासगी लॅब मधील 24 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 94 असे 199 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तालुक्यातील डाऊच येथील 75 वर्षीय महिला तर ब्राम्हणगाव येथील 77 वर्षीय महिला या दोघींचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 199 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात सब जेल येथील 38, कोपरगाव येथील 17, श्रद्धा नगर येथील 2, कर्मवीर नगर येथील 1, स्वामी समर्थ नगर येथील 1,दत्त नगर येथील 6,बाजारतळ येथील 5,ता. पोलीस स्टेशन येथील 1, गजानन नगर येथील 1, समर्थ नगर येथील 1, खडकी येथील 2, साईसिटी येथील 3, मोहिनीराजनगर येथील 1, येवला रोड येथील 1, बागुल वस्ती येथील 1, रचना पार्क येथील 1, विवेकानंद नगर येथील 1, शिवाजी रोड येथील 1, सह्याद्री कॉलनी येथील 1, साईलक्ष्मी नगर येथील 1, जोशी नगर येथील 4, लक्ष्मी नगर येथील 1, बेट येथील 1, समता नगर येथील 1, संजय नगर येथील 1, पोलीस स्टेशन जवळ येथील 1, इंदिरा नगर येथील 1, इंगळे नगर येथील 1, मांढरे बिल्डिंग येथील 1, इंदिरा पथ येथील 1, ब्राम्हण गल्ली येथील 1, धारणगाव रोड येथील 2 तर ग्रामीण मधील जेऊर पाटोदा येथील 4, कोळपेवाडी येथील 4, मूर्शतपूर येथील 3, शहाजापूर येथील 3, करंजी येथील 3, डाऊच येथील 7, राहता पोलीस स्टेशन येथील 2, धामोरी येथील 1, सांगावी भुसार येथील 3, शिंगणापूर येथील 4, दहेगाव बोलका येथील 3, पढेगाव येथील 4, सोनेवाडी येथील 1, मढी येथील 1, संवत्सर येथील 5, जे. कुंभारी येथील 2, चासनळी येथील 1, माहेगाव देशमुख येथील 2, धारणगाव येथील 2, संजीवनी येथील 7, टाकळी येथील 2, ब्राह्मणगाव येथील 3, कान्हेगाव येथील 1, रवंदे येथील 9, वेळापूर येथील 4, कोकमठाण येथील 3, दत्तवाडी येथील 1, येसगाव येथील 1, महादेव वस्ती येथील 1, चांदगव्हाण येथील 1, रांजणगाव देशमुख येथील 1, कुंभारी येथील 1, मळेगाव थडी येथील 1, सुरेगाव येथील 1, देर्डे कोर्हाळे येथील 1, वारी येथील 1 असे 199 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 7 एप्रिल पर्यंत पाच हजार 516 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 654 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 845 अॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत ऐकून 25 हजार 584 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. 66 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.