अस्तगावला 3 दिवसांत करोनाचे सहा बळी!

अस्तगावला 3 दिवसांत करोनाचे सहा बळी!
File Photo

अस्तगाव (वार्ताहर) -

करोनाने अस्तगावला तीन दिवसांत 6 जणांचा बळी गेला तर पंधरा दिवसात एकूण बळींची संख्या 11 इतकी झाली आहे. ज्या भागात हे मृत्यु झाले तो भाग ग्रामपंचायतीने सिल केला आहे.

सुरुवातीला राहाता तालुक्याच्या तुलनेत अस्तगाव भागात करोना बाधितांची संख्या नगण्य होती. पंरतु मागील आठ दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. परवा गुरुवारी तब्बल 11 जण बाधित झाले. काल शुक्रवारी दोघांना करोनाची लागण झाली. वाढती रुग्णसंख्या यामुळे अस्तगाव पंचक्रोशीत चिंतेचे वातावरण आहे. कडक निर्बंध लागु झाल्यानंतर रिकामटेकड्यांची गप्पा मारणारांची संख्या कमी झाली असली तरी प्रत्येक वस्त्यांवर आता करोना रुग्ण आढळून येत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून वेळीच उपचार न मिळणे, शुगर, बिपी यामुळे 11 जण दगावले आहेत. त्यामुळे परिसरात करोना बाबत गांभिर्य वाढले आहे. गावठाणातील 100 फुटाच्या परिसरात तिघांचा मृत्यु झाल्याने ग्रामपंचायतीने तो भाग सिल केला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणीही करण्यात आली आहे. गावठाण भागात काल ग्रामपंचायतीने फवारणी केली. काही दुकानदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील काही घरीच होम क्वारंटाईन झाले आहेत. अशांचे दुकाने ग्रामपंचायतीने काही काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात करोनाची लक्षणे लवकरात लक्षात न आल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेताना रुग्ण दिसतात. त्रास जास्त होवू लागला तरच ते कोव्हिड चाचणी करतात. अशा रुग्णांनी थोडी फार जरी लक्षणे दिसली तरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला हवे अथवा कोव्हिड चाचणी करायला हवी. दुर्लक्ष केले तर सीटीएचआरचा स्कोर 10 च्या पुढे जातो. मग ऑक्सिजन बेडची, व्हेंटीलेटरची शोधाशोध सुरु होते. दुर्दैवाने तेही ऐन वेळेत मिळत नाही. त्यासाठी लक्षण थोडी जरी दिसली तरी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र गोर्डे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com