Coronavirus : जिल्ह्यात आज तीन हजार १४४ रुग्णांची नोंद

नगरसह 'या' तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
Coronavirus : जिल्ह्यात आज तीन हजार १४४ रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात शनिवारी नव्याने 3 हजार 144 करोना संक्रमित वाढले. यात नगर तालुका टॉपवर असून त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातही करोनाने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. नगर शहर, पाथर्डी आणि कोपरगाव या तालुक्यांचाही सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पाच तालुक्यांत समावेश आहे. दरम्यान करोना बळींच्या आकडेवारीत आणखी 20 बळींची वाढ झाली.

जिल्ह्यात काल 3 हजार 592 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 3 हजार 842 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 89.11 टक्के झाले असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 22 हजार 461 आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 147, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 817 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 180 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 37, जामखेड 1, कर्जत 23, कोपरगाव 15, नगर ग्रामीण 15, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 3, राहुरी 18, संगमनेर 2, श्रीगोंदा 14, श्रीरामपूर 5, कॅटोन्मेंट बोर्ड 1, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 240, अकोले 8, जामखेड 23, कर्जत 20, कोपरगाव 163, नगर ग्रामीण 361, नेवासा 102, पारनेर 29, पाथर्डी 75, राहाता 149, राहुरी 69, संगमनेर 95, शेवगाव 86, श्रीगोंदा 32, श्रीरामपूर 315, कँटोन्मेंट बोर्ड 6, इतर जिल्हा 42 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 1 हजार 180 जण बाधित आढळून आले. मनपा 39, अकोले 131, जामखेड 12, कर्जत 95, कोपरगाव 57, नगर ग्रामीण 89, नेवासा 47, पारनेर 105, पाथर्डी 186, राहाता 64, राहुरी 88, संगमनेर 66, शेवगाव 45, श्रीगोंदा 66, श्रीरामपूर 71, कँटोन्मेंट 08 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 430 होती. त्यात काल 20 ने वाढल्याने जिल्ह्यातील करोना बळींचा आकडा आता 2 हजार 450 झाला आहे.

तालुकानिहाय बाधित

नगर तालुका 465, श्रीरामपूर 391, मनपा 316, पाथर्डी 264, कोपरगाव 235, राहाता 213, राहुरी 175, संगमनेर 163, नेवासा 152, अकोले 139, कर्जत 138, पारनेर 135, शेवगाव 131, श्रीगोंदा 112, अन्य जिल्हा 57, जामखेड 38, भिंगार 15, लष्कर रुग्णालय 5 आणि अन्य राज्य 2 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com