Coronavirus : दिलासादायक! जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्या एक हजाराच्या आत

Coronavirus : दिलासादायक! जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्या एक हजाराच्या आत
कराेना रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांनंतर पहिल्यांदा करोना बाधितांची संख्या एक हजारांच्या आत आली आहे. यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला असला तर करोना मृतांच्या संख्येत 45 ची भर पडली आहे. दरम्यान उपचार सुरू असणार्‍यांची संख्या देखील 11 हजारांच्या आत आली आहे.

जिल्ह्यात काल 1 हजार 846 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या आता 2 लाख 48 हजार 33 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 94.62 टक्के झाले आहे. दरम्यान, काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत अवघ्या 912 नवीन करोना रुग्णांची भर पडली असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 10 हजार 884 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 223, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 359 आणि अँटीजेन चाचणीत 330 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 7, अकोले 26, जामखेड 2, नगर ग्रामीण 17, नेवासा 27, पारनेर 21, पाथर्डी 7, राहता 1, राहुरी 2, संगमनेर 74, शेवगाव 3, श्रीगोंदा 3, इतर जिल्हा 1 आणि इतर राज्य 32 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 34, अकोले 2, जामखेड 39, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 35, नेवासा 15, पारनेर 26, पाथर्डी 4, राहाता 12, राहुरी 25, संगमनेर 34, शेवगाव 48, श्रीगोंदा 31, श्रीरामपूर 41, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 8 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 330 जण बाधित आढळुन आले. मनपा 4, अकोले 29, जामखेड 8, कर्जत 26, कोपरगाव 22, नगर ग्रामीण 11, नेवासा 39, पारनेर 12, पाथर्डी 27, राहाता 29, राहुरी 13, संगमनेर 29, शेवगाव 27, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 29, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3 हजार 173 होती. त्यात 45 ची भर सोमवारी पडली. यामुळे करोना बळींची संख्या आता 3 हजार 218 झाली आहे.

संगमनेर 137, नेवासा 81, शेवगाव 78, श्रीरामपूर 70, नगर ग्रामीण 63, पारनेर 59, अकोले 57, श्रीगोंदा 55, जामखेड 49, नगर मनपा 45, राहाता 42, राहुरी 40, पाथर्डी 38, अन्य राज्य 32, कर्जत 26, कोपरगाव 26, अन्य जिल्हा 12, भिंगार 2 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com