Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ८८२ नवे रुग्ण

Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ८८२ नवे रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी नव्याने 2 हजार 882 करोना रुग्ण समोर आले असून यात पुन्हा संगमनेर तालुका टॉपवर आला आहे जिल्ह्यातील करोनातून मुक्त होणार्‍यांची टक्केवारी 89.42 टक्के असली तरी दररोजच्या आकडेवारी नवीन तालुक्यातून रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान करोना मृतांच्या आकडेवारी काल 31 ची वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात काल 3 हजार 296 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 2 लाख 7 हजार 138 झाली आहे. तर करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 22 हजार 16 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 224, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 408 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 250 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 25, कर्जत 10, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 36, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 3, राहता 2, राहुरी 29, संगमनेर 1, श्रीगोंदा 69, श्रीरामपूर 5, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 90, अकोले 96, जामखेड 78, कर्जत 48, कोपरगाव 36, नगर ग्रामीण 148, नेवासा 107, पारनेर 85, पाथर्डी 41, राहाता 90, राहुरी 39, संगमनेर 242, शेवगाव 128, श्रीगोंदा 35, श्रीरामपूर 104, कँटोन्मेंट बोर्ड 2, इतर जिल्हा 38 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 1250 जण बाधित आढळुन आले.

मनपा 59, अकोले 68, जामखेड 64, कर्जत 151, कोपरगाव 86, नगर ग्रामीण 86, नेवासा 78, पारनेर 74, पाथर्डी 121, राहाता 70, राहुरी 110, संगमनेर 67, शेवगाव 60, श्रीगोंदा 86, श्रीरामपूर 59, कँटोन्मेंट 6 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 45 होती. त्यात रविवारी 31 ने वाढ होवून करोना बळींची संख्या आता 2 हजार 481 झाली आहे.

असे आहेत आजचे बाधित

संगमनेर 310, नगर ग्रामीण 270, कर्जत 209, श्रीगोंदा 19, नेवासा 188, शेवगाव 188, राहुरी 178, नगर मनपा 174, श्रीरामपूर 168, पाथर्डी 165, अकोले 164, राहाता 162, पारनेर 160, कोपरगाव 154, जामखेड 142, अन्य जिल्हा 47, भिंगार 12, अन्य राज्य 1, लष्कर रुग्णालय 0 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com