COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार २०७ रुग्णांची नोंद

'या' तालुक्यांमध्ये द्विशतक
COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार २०७ रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी नव्याने 2 हजार 207 नवे करोना रुग्ण वाढले आहेत. करोनातून मुक्त होणार्‍यांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी काल नव्याने 66 करोना मृतांची भर जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीत पडली आहे. यामुळे करोना मृतांचा आकडा आता 3 हजारांच्या जवळ पोहचला आहे.

जिल्ह्यात काल 3 हजार 713 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 2 लाख 38 हजार 378 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 93.42 टक्के झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 13 हजार 830 पर्यंत खाली आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 384, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 118 आणि अँटीजेन चाचणीत 705 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 1, अकोले 16, कर्जत 77, नगर ग्रामीण 38, नेवासा 10, पारनेर 22, पाथर्डी 2, राहता 24, राहुरी 6, संगमनेर 75, शेवगाव 90, श्रीगोंदा 15, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 61, अकोले 17, जामखेड 106, कर्जत 6, कोपरगाव 48, नगर ग्रामीण 65, नेवासा 53, पारनेर 40, पाथर्डी 87, राहाता 52, राहुरी 114, संगमनेर 68, शेवगाव 67, श्रीगोंदा 120, श्रीरामपूर 187, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 22 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 705 जण बाधित आढळुन आले. मनपा 24, अकोले 33, जामखेड 8, कर्जत 44, कोपरगाव 67, नगर ग्रा. 38, नेवासा 35, पारनेर 82, पाथर्डी 69, राहाता 33, राहुरी 43, संगमनेर 64, शेवगाव 28, श्रीगोंदा 81, श्रीरामपूर 48 आणि इतर जिल्हा 8 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी करोनामुळे मृतांची संख्या 2 हजार 903 होती. त्यात बुधवारी 66 ने वाढ झाली असून आता करोना मृतांचा आकडा हा 2 हजार 969 वर पोहचला आहे.

आजचे बाधित

श्रीरामपूर 235, श्रीगोंदा 216, संगमनेर 207, शेवगाव 185, राहुरी 163, पाथर्डी 158, पारनेर 144, नगर तालुका 141, कर्जत 127, कोपरगाव 115, जामखेड 114, राहाता 109, नेवासा 98, नगर शहर 86, अकोले 66, भिंगार 4, परजिल्हा 37, परराज्य 1 आणि मिलिटरी 1 यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com