COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

1 ते 18 वयोगटातील 309 रुग्ण आढळल

अहमदनगर | Ahmednagar

जिल्हा काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर सोमवारी पुन्हा करोना बाधितांच्या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यासह संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगावमध्ये करोनाचे द्विशतक केले असून उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 15 हजार 442 आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात 1 ते 10 वर्षे वयोगटातील 96 तर 11 ते 18 वर्षे वयोगटातील 213 असे 18 वर्षाच्या आतील 309 करोना रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात काल 2 हजार 64 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनावर मात केलेल्यांची संख्या 2 लाख 32 हजार 467 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 92.70 टक्के झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 776, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 597 आणि अँटीजेन चाचणीत 890 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 3, अकोले 100, जामखेड 115, कर्जत 1, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 60, नेवासा 63, पारनेर 60, पाथर्डी 28, राहता 38, राहुरी 2, संगमनेर 77, शेवगाव 158, श्रीगोंदा 53, श्रीरामपूर 8, कँटोन्मेंट 2, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 70, अकोले 8, जामखेड 8, कर्जत 89, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 27, नेवासा 11, पारनेर 15, पाथर्डी 4, राहाता 20, राहुरी 59, संगमनेर 54, शेवगाव 4, श्रीगोंदा 24, श्रीरामपूर 171 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 890 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, अकोले 51, जामखेड 12, कर्जत 40, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 44, नेवासा 52, पारनेर 120, पाथर्डी 98, राहाता 24, राहुरी 57, संगमनेर 139, शेवगाव 41, श्रीगोंदा 104, श्रीरामपूर 47 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

संगमनेर 270, श्रीरामपूर 226, शेवगाव 203, पारनेर 195, श्रीगोंदा 181, अकोले 159, जामखेड 135, नगर ग्रामीण 131, कर्जत 130, पाथर्डी 130, नेवासा 126, राहुरी 181, नगर मनपा 83, राहाता 82, कोपरगाव 71, अन्य जिल्हा 20, भिंगार 2 आणि लष्कर रुग्णालय 1 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com