Video : तहसीलदार उतरले रस्त्यावर

Video : तहसीलदार उतरले रस्त्यावर

नेवासा l तालुका वार्ताहर

तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, प्रशासन नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देत असले तरी मात्र नागरिक त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान संचारबंदी असताना नेवासा शहरातील रस्त्यांवर भाजीपाला-फळे विक्रेते हातगाड्या लावून विक्री करताना नियमांचे पालन होत नसतांना दिले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्वतः रस्त्यावर उतरत फळ व भाजी विक्रेत्यांना गल्लीत फिरून विक्री करा अन्यथा भाजीपाला व फळे जमा करण्यात येतील असा इशारा दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com