पळपूटेपणा करू नका, जबाबदारी घ्या!

नगरच्या डॉक्टर संघटनेने प्रशासनाला खडसावले
पळपूटेपणा करू नका, जबाबदारी घ्या!

अहमदनगर l प्रतिनिधी

करोनाकाळात एकमेकांशी समन्वय ठेवून मार्ग काढण्याची गरज असताना वैैद्यकीय क्षेत्र आणि प्रशासनात वादाच्या ठिणग्या झडण्याची चिन्हे आहेत.

ऑक्सीजनची व्यवस्था स्वत:च करा, असा सल्ला देणार्‍या जिल्हा प्रशासनाने ‘ऑक्सीजनअभावी रूग्णाचा मृत्यू झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील’ असे स्पष्टपणे कळविले आहे. पळपुटेपणा करू नका, जबाबदारी घ्या असाच अप्रत्यक्ष सल्ला दिल्याचे मानले जात आहे.

Title Name
VideoStory : चिलेखनवाडीची ऑक्सीजन फॅक्टरी
पळपूटेपणा करू नका, जबाबदारी घ्या!

खाजगी रुग्णालय यांनी त्यांच्या स्तरावर स्वत:च्या रुग्णालयासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करावे आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करावी. यामुळे त्यांच्या रुग्णालयाची ऑक्सिजनची गरज भागविणे शक्य होईल, असा सल्ला काल प्रशासनाकडून रूग्णालयांना देण्यात आला. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने आक्षेप घेतला आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये अशीच स्थिती उद्भवली होती. त्यावेळीही या स्थितीची प्रशासन आणि पालकमंत्र्यांचा जाणीव करून देण्यात आली होती. सध्या डॉक्टर रूग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत. मात्र त्यांनाच व्यवस्था उभारा, असा सल्ला देणे हास्यास्पद आणि जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे. कोणत्याही कायद्यात ऑक्सीजन निर्मिती ही हॉस्पीटलची जबाबदारी नाही. खासगी रूग्णालये बाजार भावाने ऑक्सीजन विकत घेण्यास तयार आहेत. योग्य प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हॉस्पीटल डिसर्लकडून ऑक्सीजन विकत घेतात, मात्र त्यांनाच ऑक्सीजन मिळाला नाही तर ते रूग्णालयांना कसा पुरवणार? त्यात जिल्हा प्रशासनाचे पत्र संभ्रम निर्माण करत आहे.

ऑक्सीजन अभावी रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. ऑक्सीजनच्या उपलब्धेत अशाच अडचणी येत राहील्यास डॉक्टरांना नाईलाजाने उपचार थांबवावे लागतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

Title Name
बेड तसेच ऑक्सीजन न मिळाल्याने श्रीरामपूरच्या तरूणासह तिघांचा नगरमध्ये मृत्यू
पळपूटेपणा करू नका, जबाबदारी घ्या!

प्रशासनाचा सल्ला काय होता?

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी खासगी हॉस्पिटला पाठविलेल्या पत्रात जिल्ह्यामध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या, शासकीय रुग्णालयांची असलेली क्षमता यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा पुरवठा होत नाही. तसेच खाजगी रुग्णालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ऑक्सिजन उपलब्धता व ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

यामुळे खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनांनी ऑक्सिजन पुरवठादार यांचेकडून विनाखंडीत ऑक्सिजन पुरवठा होईल, याबाबत योग्य ते नियोजन करावे. वाढती करोना रुग्णसंख्या व संभाव्य तिसर्‍या करोना लाटेच्या अनुषंगाने खाजगी रुग्णालय यांनी त्यांच्या स्तरावर स्वत:च्या रुग्णालयासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करावे आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करावी. यामुळे त्यांच्या रुग्णालयाची ऑक्सिजनची गरज भागविणे शक्य होईल, असा सल्ला देण्यात आला आहे.

एका प्रकारे प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा आणि नियंत्रणातून आले हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा या पत्रानंतर सुरू झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com