RT-PCR लॅब व ऑक्सिजन प्लांट युद्धपातळीवर स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे साई संस्थानला आदेश

RT-PCR लॅब व ऑक्सिजन प्लांट युद्धपातळीवर स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे साई संस्थानला आदेश

शिर्डी (प्रतिनिधी)-

प्रादुर्भाव व दुसर्‍या लाटेत वाढणारी रुग्णाची संख्या लक्षात घेता साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन RTPCR लॅब स्थापन करून कोव्हिड रुग्णांची तातडीने चाचणी करण्याची सोय करावी,

साईबाबा संस्थानच्या ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत उच्च न्यायालयाने सदर प्लांट युद्धपातळीवर तातडीने उभा करावा व जास्त ऑक्सिजन निर्मिती झाल्यास जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांना पुरवावा असे आदेश उच्च न्यायायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थानला दिले.

तसेच करोनासाठी जिल्ह्यात विविध हॉस्पिटलला लागणारी औषधे, यंत्रसामुग्रीच्या मागणीचा अहवाल अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने शासनास सादर करावेत, असे आदेशही दिले आहेत.

सध्या प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नासिक व सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांची तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे. सदर समिती ऑक्टोबर 2019 पासून साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे. तदर्थ समितीला याचिकाकर्ते यांनी वरील विषयावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पत्रव्यवहार केले होते. तसेच याचिकाकर्ते संजय काळे व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थानच्या डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी व इतर यांना संपर्क करून वरिलबाबी कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता.

त्याअनुषंगाने आज दि. 20. एप्रिल 2021 रोजी उच्च न्यायायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस डी कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन RTPCR लॅब लवकरात लवकर युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश दिले. सदर लॅब चा भविष्यात पॅथॉलॉजिकल लॅब म्हणून करावा असेही आदेश दिली. संस्थानच्या काही तज्ञ डॉक्टर्सनी RTPCR लॅबमधील कामाचे प्रशिक्षण देखील घेतले आहे असे देखील संस्थानच्यावतीने सांगण्यात आले.

तसेच सद्याच्या करोनाच्या परिस्थितीनुसार संस्थानच्या हॉस्पिटल ला लागणारे डॉक्टर्स, नर्सेस, इ. पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले. तसेच साईबाबा संस्थानला करोनावर मात करण्यासाठी लागणारी औषधें तातडीने खाजगी कंपनीकडून विना टेंडर प्रक्रियेने खरेदी करण्याचे आदेश दिली. तसेच जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी करोनासाठी जिल्ह्यात विविध हॉस्पिटलला लागणारी औषधे, यंत्रसामुग्रीच्या मागणीचा अहवाल तातडीने शासनास सादर करून शासनाने सदर हॉस्पिटल ला योग्य दारात औषधे, यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच साईबाबा संस्थानच्या ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत मउच्च न्यायालयाने सदर प्लांट युद्धपातळीवर तातडीने उभा करावा व जास्त ऑक्सिजन निर्मिती झाल्यास जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांना पुरवावा असे देखील आदेश दिले.

सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने अ‍ॅड. एस. जी. कार्लेकर, तर संस्थांच्यावतीने अ‍ॅड. अनिल बजाज यांनी काम पाहिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com