वडाळा बहिरोबा | वार्ताहर | Wadala Bahiroba

अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात करोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील करोना रूग्ण वाढत असल्याने जनता कर्फ्युचा घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतचे मार्गदर्शक श्री चांगदेव मोटे व शिंगणापूर पोलिस स्टेशनचे पी.आय.बागुल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत काय निर्णय झाला?

१) मंगळवार ते शुक्रवार वैदयकिय सेवा, औषधालय(मेडिकल), बँक वगळता संपूर्ण गाव कड़कड़ित बंद. जनता कर्फ्यु

२) शनिवार पासुन सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वा .पर्यंत उघडी राहणार.

३) प्रत्येकाने मास्क वापरने बंधनकारक

४) दैनंदिन वापरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे.

५) ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊं नये. कलम 144 लागु.

दरम्यान, आपल्या शेजारी करोनाचा रुग्ण आढळल्यास त्वरीत ग्रामपंचायतशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.