डॉक्टर व बँक कॅशियरचा करोनामुळे मृत्यू

श्रीरामपुरात 51 बाधित; तालुक्याने केला 1 हजाराचा टप्पा पार
डॉक्टर व बँक कॅशियरचा करोनामुळे मृत्यू

श्रीरामपूर (प्रतिनिधी) | Shrirampur -

करोनामुळे एका बँकेतील कॅशियरचा व एका डॉक्टरचा मृत्यू झाला. काल एकूण 29 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून यात

17 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात 10, तर खासगी प्रयोग शाळेत 24 असे काल एका दिवसात 51 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 1002 वर जाऊन पोहचली आहे.

काल 32 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काल करोनाचे बळी ठरलेल्या बँकेच्या कॅशिअरवर गेल्या तीन-चार दिवसांपासून नगर येथे उपचार सुुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच राहुरी येथील रहिवासी व श्रीरामपूरमध्ये वैद्यकीय व्यावसाय करीत असलेल्या एका डॉक्टरचा गेल्या काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यामुळे ते उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांना न्युमोनिया या आजाराने ग्रासले त्यात त्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. उपचार सुरु असताना काल त्यांचा मृत्यू झाला.

काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांत वॉर्ड नं. एक-6, वॉर्ड नं. दोन-4, वॉर्ड नं. सहा-1, वॉर्ड नं. सात -1, बेलापूर 2, अशोकनगर 1, सुतगिरणी 1, निपाणी वडगाव 1 असे 17 जणांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2826 जणांची करोना चाचणी करण्यात आली असून यात 1002 पॉझिटीव्ह तर 1858 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com