करोनाचा वाढता प्रादुर्भाव! 'या' तालुक्यातील १२ गावे पुन्हा लॉक

करोनाचा वाढता प्रादुर्भाव! 'या' तालुक्यातील १२ गावे पुन्हा लॉक

पारनेर | तालुका प्रतिनिधी | Parner

आगामी करोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पारनेर तालुक्यातील वाढती करोना बाधितांची संख्या पाहाता तालुक्यातील १२ गावे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. मंगळवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यातील पारनेर ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हुर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव! 'या' तालुक्यातील १२ गावे पुन्हा लॉक
साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक; काय आहे प्रकरण?

पारनेर तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आयुक्त गमे यांनी भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हुर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांसह सर्व गावातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच तीन ऑक्टोबरपर्यंत ही १२ गावे बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढला असून कोरोना समितीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर सुरु करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या आहेत. तर याच ग्रामीण रुग्णालयात करोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर सुद्धा उपचार करण्यात यावे, यासाठी पण इतर विभाग कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच पूर्णवाद भवन येथील करोना सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेश अढारी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सरपंच अरुणा खिलारी, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडूंगे, किरण तराळ, बापूसाहेब रांधवन, ग्रामविकास अधिकारी रोहिणी तरवडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान पारनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पारनेर तालुक्यातील अनेक गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ग्रामपंचायत पातळीवरील कोरोना समितीस नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. बाधितांनी घरामध्ये उपचार न करता सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार करावे, अशा सूचना दिल्या आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले.

Related Stories

No stories found.