करोना नियमांचे उल्लंघन; हॉटेलवर कारवाई, एकावर गुन्हा दाखल

करोना नियमांचे उल्लंघन; हॉटेलवर कारवाई, एकावर गुन्हा दाखल

नेवासा | तालुका वार्ताहर

तालुक्यातील देवगड फाट्याजवळील दत्त दिंगबर हाॅटेलवर नेवासा पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, नगर-औरंगाबाद हायवेवरील देवगड फाट्याजवळ हाॅटेल दत्त दिंगबर आहे. नेवासा पोलिस निरीक्षक विजय करे, सपोनि विजय ठाकूर,हवालदार सुरेश शिंदे,चालक दिलिप कु-हाडे आदि गुरूवारी (दि.२२) रात्री सात सुमारास हायवेवर गस्त घालत असतांना रात्री ७.३०ते ७.४५ वा. दरम्यान हाॅटेल युवा सेना जिल्हा प्रमुख नीरज विलास नांगरे यांचे बंधू सुरज विलास नांगरे हा विनाकारण हाॅटेल उघडे ठेवून लोकांची गर्दी जमवून करोना साथीचा प्रसार होईल असे करतांना आढळून आला.

शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुरज नांगरे विरुद्ध नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अशोक कुदळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास अशोक नागरगोजे करत आहेत. या कारवाईने हायवेवरील हाॅटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

विनाकारण जर कोणी हॉटेल उघडे ठेवून कायद्याचे उल्लंघन करत असेल तर कारवाईला सामोरे जावे लागेल.

पोलीस निरीक्षक विजय करे

माझ्या हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था असुन मॅनेजर, कुक, वेटर, व अन्य कामगार राहतात त्यामुळे हॉटेलची एक साईट उघडी राहते. मात्र पोलीस आधिकारी यांनी आमचे ऐकुन घेतले नाही. तसेच मधील काळात अवैध धंद्या विरोधात आवाज ऊठविल्याने व राजकीय दबावा पोटी माझ्या हॉटेलवर कारवाई केली.

नीरज नांगरे, युवा सेना जिल्हा प्रमुख.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com