COVID19 : 31 मृत्यूंसह 1998 करोना रुग्ण वाढले रुग्ण

उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 13 हजारांच्या टप्प्यात, बरे होणार्‍यांची टक्केवारी घसरली
COVID19 : 31 मृत्यूंसह 1998 करोना रुग्ण वाढले रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाच्या उद्रेकासोबतच मृत्यूचे तांडव सुरू आहे. सोमवारी नव्याने करोनाचे 1 हजार 998 करोना रुग्ण समोर आले असून

जिल्हा यंत्रणेच्या आकडेवारीत एकाच दिवसात 31 मृत्यू वाढलेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान काल नगरच्या अमरधाममध्ये दिवसभरात 43 मृतांवर अत्यंसंस्कार करण्यात आले यावरून करोना मृत्यूंचा तांडव किती भयावह असले याची जाणीव होत आहे. तसेच करोना उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 13 हजारांच्या टप्प्यात पोहचली आहे.

जिल्ह्यात काल 1 हजार 842 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 3 हजार 749 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 87.89 टक्के झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 12 हजार 983 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 657, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 337 आणि अँटीजेन चाचणीत 1004 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कारोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 218, जामखेड 67, कर्जत 79, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 41, नेवासा 8, पारनेर 38, पाथर्डी 23, राहता 19, राहुरी 9, संगमनेर 67, शेवगाव 15, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 37, कँटोन्मेंट बोर्ड 13, मिलिटरी हॉस्पिटल 01 इतर जिल्हा इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 98, अकोले 11, जामखेड 4, कर्जत 3, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 22, नेवासा 9, पारनेर 4, पाथर्डी 6, राहाता 74, राहुरी 14, संगमनेर 23, शेवगाव 2, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 31, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 14 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1004 जण बाधित आढळुन आले. मनपा 66, अकोले 71, जामखेड 2, कर्जत 140, कोपरगाव 51, नगर ग्रामीण 87, नेवासा 65, पारनेर 44, पाथर्डी 105, राहाता 31, राहुरी 105, संगमनेर 21, शेवगाव 88, श्रीगोंदा 62, श्रीरामपूर 59, कॅन्टोन्मेंट बोर्ड 2 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आजचा करोना

नगर शहर 381, कर्जत 222, नगर ग्रामीण 150, पाथर्डी 134, नगर तालुका 198, अकोले 171, राहुरी 128, श्रीरामपुर 127, राहाता 124, संगमनेर 111, शेवगाव 105, पारनेर 86, श्रीगोंदा 86, अकोले 82, नेवासा 82, जामखेड 73, कोपरगाव 63, अन्य जिल्हा 21, भिंगार 19, अन्य राज्य 2, लष्कर 1 असे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com