देवगड फाटा (वार्ताहर)

देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

करोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नेवासा तालुक्यातील श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र, देवगड हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक व्यवस्थापनाने घेतलेला आहे. रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक व्यवस्थापनाने घेतलेला आहे.

तसेच मंदिरातील नित्यपूजा, आरती ही नियमित सुरु राहील, परंतु बाहेरगावाहून आलेल्या यात्रेकरू पर्यटक दर्शनार्थींसाठी मात्र मंदिर दर्शनासाठी खुले असणार नाही.

याचबरोबर भगवान दत्तात्रय मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर, श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर ही देवालये तसेच प्रवरापात्रात नौकाविहार ही बंद असणार आहे. यात्री निवास, भक्त निवास, यात्रिभुवन, श्रीदत्त भुवन, सत्संग भुवन या वास्तू देखील बंद करण्यात आल्या आहेत.

परिसरात असणारी छोटी हॉटेल्स, प्रसादालय, दुकाने हेही बंद असतील. देवस्थानच्या वतीने महंत भास्करगिरीजी महाराजांनी जनतेस आवाहन केले आहे की, कृपया आपण आपापल्या घरून नामचिंतन करत दर्शन घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे, दोन व्यक्ती मधील अंतर दोन मीटर ठेवावे, तोंडावर मास्क लावावा, वेळोवेळी हात धुवावे असे आवाहन त्यांनी केले.