अकोले तालुक्यात करोनाचा तिसरा बळी

केळी (गोडेवाडी) येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू
अकोले तालुक्यात करोनाचा तिसरा बळी

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज सकाळीच तालुक्यातील विरगाव येथील एका १२ वर्षाच्या मुलीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दुसरीकडे सकाळीच नाशिक येथील शासकीय रूग्णालयात केळी (गोडेवाडी) येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्युने तालुक्यातील करोनाचा तिसरा बळी गेला आहे.

संबंधित ७५ वर्षीय व्यक्ती मुंबई वरुन तालुक्यातील केळी (गोडेवाडी) या गावी आल्यानंतर त्यास ञास जाणवू लागला होता. अहमदनगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. तो नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत होता. काल मध्यरात्री उपचारा दरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात एकूण रुग्णांची संंख्या ७४ झाली

आहे. त्यापैकी ४५ जण करोनामुक्त झाले असून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर २९ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com