नेवासा तालुक्यात करोनाचा कहर !
सार्वमत

नेवासा तालुक्यात करोनाचा कहर !

रुग्ण संख्या ३०० वर

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात शहरातील १० व्यक्तीसह तालुक्यातील सतरा रुग्ण करोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.

गुरुवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे ११९ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यामध्ये नेवासा शहरातील दहा, नेवासा बुद्रुक तीन, खेडलेकाजळी दोन, उस्थळदुमाळा व नारायणवाडी येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १०२ व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या ३०० वर गेली आहे. तर २४ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने २०४ रुग्ण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com