नेवासा शहरात करोनाचा चौथा बळी
सार्वमत

नेवासा शहरात करोनाचा चौथा बळी

तालुक्यातील मृतांची संख्या ११

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

नेवासा शहरातील आणखी एका करोना Corona बाधिताचा मृत्यू झाल्याबाबतची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा Tahasildar Rupesh Kumar Surana यांनी दिली. शनिवार १५ ऑगस्ट 15 August रोजी घेण्यात आलेल्या Rapid Antigen Test मध्ये 65 वर्षीय व्यक्ती करोना बाधित असल्याचे आढळले होते. त्यानंतर या 65 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नेवासा येथील कोविड केअर सेंटर Covid Care Center मध्ये प्रथम ऑक्सिजन लावण्यात आला मात्र तरी देखील श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले होते.

आज रविवार १६ ऑगस्ट रोजी ६५ वर्ष व्यक्ती मयत झाले असल्याचे नातेवाईकाने तालुका प्रशासनास फोनवरून माहिती दिली. तर तालुक्यातील ११ करोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com