Good News : राज्यात करोना लाट पुढच्या महिन्यापासून ओसरेल

राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज
Good News : राज्यात करोना लाट पुढच्या महिन्यापासून ओसरेल

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ओसरेल असा राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज असल्याचे राज्य कोविड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.

गेले काही दिवसांपासून राज्यात दररोज 60 हजारांपेक्षा अधिक नवे करोना पाझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. पहिल्या लाटेत गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली होती.

एका विशिष्ट कालावधीत रुग्णसंख्या शिगेला पोचते आणि नंतर हळूहळू कमी होते असं आतापर्यंत दिसून आले आहे. दुसर्‍या लाटेत रोजची रुग्णसंख्या 60-70 हजाराच्या पलिकडे गेल्यानंतर आणखी वाढण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यासाठी सर्वांनीच कोविड प्रतिबंधासाठीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे असेही आवटे म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com