करोना लस घेताना ‘करोना’लाच आमंत्रण !

लस घेताना तिसगावमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा : पोलिसांचा हस्तक्षेप
करोना लस घेताना ‘करोना’लाच आमंत्रण !

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आलेल्या

नागरिकांनी मंगळवारी मोठी गर्दी केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात करावे लागले. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच गर्दी नियंत्रणात आली. आरोग्य केंद्रात आलेले नागरिक घेण्यासाठी आलेले नागरिक कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन न ठेवता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याची संतप्त भावना ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी व्यक्त केली आहे.

तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीचे 230 डोस आल्याची माहिती नागरिकांना वार्‍यासारखी समजली. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिकांनी या ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी सुरू केली. ऑनलाइन पद्धत बंद असल्यामुळे उपस्थितांना आधार कार्डद्वारे चिठ्ठी देऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली.

परंतु काही लोकांनी याठिकाणी वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे तिसगाव बीटचे पोलीस हवालदार आप्पासाहेब वैद्य हे सहकार्‍यांसोबत या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गर्दी पांगविण्यासाठी खाक्या दाखवला त्यानंतर काही वेळातच गर्दी नियंत्रणात आली.

त्यानंतर रांगेत उभा राहून करोना लसीकरण सुरू झाले, असे असले तरी कुठल्या प्रकारचा सोशल डिस्टन्स याठिकाणी दिसून आला नाही. त्यामुळे करोनाची लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींच्या गर्दीमुळे करोनालाच आमंत्रण मिळते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती.

लस घेण्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज किमान 400 लसीचे डोस प्राप्त झाले पाहिजेत तरच गर्दी न होता सर्वांना सुरळीत लस देणे शक्य होणार आहे. तशी मागणी देखील जिल्हा प्रशासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com