साठा संपला, अनेकांना लस न घेता जावे लागले परत

सुपा गावात लागल्या रांगा : अवघे 156 डोस आले
साठा संपला, अनेकांना लस न घेता जावे लागले परत

सुपा |वार्ताहर| Supa

सुपा ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सहकार्‍यांने सुपा आरोग्य उपकेंद्रावर शुक्रवारी 60 वर्षाच्या पुढील ज्येष्ठांचे करोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मर्यादित 153 डोस उपलब्ध असल्याने अनेकांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

तालुक्यातील रुईछत्रपती आरोग्य केंद्र व सुपा ग्रामपंचायतीच्या वतीने गावात बाजार तळावर आरोग्य उपकेंद्रात काल करोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. रुईछत्रपती अडमार्गी असल्याने सर्वसामान्य ज्येष्ठांना या आरोग्य केंद्रापर्यत जाण्यास अडचणी येत असल्याने सुपा ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेत गावात लसीकरण करावे, यासाठी पत्रव्यावहार केला व त्याला आरोग्य विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

लसीकरणासाठी ग्रांमपचायतीच्या वतीने रुग्णांच्या सावलीसाठी मंडपही टाकला, तसेच वीज आणि इंटरनेटची व्यवस्था करुन दिली. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व ज्यांना पहिला डोस देऊन 45 दिवस झाले आहेत, अशांना नियमावली प्रमाणे प्राधान्य देत सुरूवातीला लसीकरण केले. यात काही फ्रंटलाईन वर्कर, शिक्षण, आरोग्य कर्मचारी याचा समावेश होता. त्यानंतर ज्या ज्येष्ठांनी पहिला डोस घेऊन 45 दिवस झाले आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर नंबरप्रमाणे आलेल्या व 60 वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना करोना लसचा डोस देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

सुपा आरोग्य उपकेंद्र मध्यवर्ती असल्याने व दळणवळणास सोईस्कर असल्याने मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आले होते. सकाळी 7 पासून नागरिक रांगेत सुपा बाजारतळावर बसले होते. आरोग्य केंद्रावर लसीकरणाला आरंभ करतांना आजी-माजी सरपंच, सदस्य, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अवघे 153 डोस असल्याने लसीकरणासाठी मोठ्या संख्याने नागरिक आल्याने ज्येष्ठांना लस न घेताच परत जावे लागले.

यावेळी रुईछत्रपती आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. अश्विनी गुंजाळ, आरोग्य अधिकारी डॉ. साठे, डॉ. शिंदे डॉ. विद्या बारवकर, आरोग्य सेविका अंजली वर्पे, आशा सेविका उपस्थितीत होत्या. ग्रामपंचायत कर्मचारी जावेद तांबोळी, सुशांत गायकवाड, विलास जाधव, आरीफ शेख, रफिक शेख, सलिम तांबोळी यांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com