विळदमध्ये 60 जणांचे लसीकरण

विळदमध्ये 60 जणांचे लसीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील विळद ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने जलशुद्धीकरण प्राथमिक शाळा (गवळीवाडा) येथे मंगळवारी (25 मे) 60 नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचणी केल्यानंतर करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला अशी माहिती सरपंच संजय बाचकर यांनी दिली

यावेळी उपसरपंच स्वाती निमसे, ग्रामसेविका सौ. गायकवाड, माजी सरपंच मनीषा बाचकर, कैलास अडसुरे, सागर जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत अडसुरे, दक्षता कमिटीचे अध्यक्ष हनीप शेख, वनसमितीचे उपाध्यक्ष संतोष अडसुरे, संदीप जगताप, पांडुरंग निमसे, अजीज शेख, विकास शिंदे, नितीन नागपुरे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com