समन्वयाच्या अभावामुळे लसीकरण मोहिमेत गोंधळाची परंपरा कायम !

454 जणांना दिला डोस || राजकीय हस्तक्षेप थांबविण्याची मागणी
समन्वयाच्या अभावामुळे लसीकरण मोहिमेत गोंधळाची परंपरा कायम !

सुपा |वार्ताहर| Supa

सुपा (ता. पारनेर) येथे सोमवारी करोना लसीकरणादरम्यान (Corona Vaccination) मोठा गोंधळ (Confusion) होवून यावेळी शाब्दीक चकमकही उडाली. तर साडेचारशे नागरिकांचे करतांना करतांना अरोग्य विभागाचे (Department of Health) कर्मचारी हैराण झाले. यावेळी ग्रामपंचायत (Grampanchayat), पोलीस प्रशासन (Police Administration) आणि आरोग्य विभागात (Department of Health) समन्वय नसल्याचे दिसून आले. यामुळे येथील गोंधळाची परंपरा कायम राहिली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (ZP School) काल करोना लसीकरण (Corona Vaccination) ठेवण्यात आले होते. गावात दोन आठवड्यापूर्वी लसीकरण (Vaccination) झाले होते. लसीकरणात मोठा खंड पडलेला असतांना काल लस येताच नागरिक मोठी गर्दी (Crowd) केली होती. यामुळे नेहमी प्रमाणे या ठिकाणी गोंधळ उडाला. सुरूवातीला गर्दी जास्त झाल्याने पोलिस बोलावण्यात आले. तेव्हा ग्रामपंचायत (Grampanchayat), आरोग्य विभाग (Department of Health) व पोलिस प्रशासन (Police Administration) यांच्यात कोणताच समन्वय नसल्याचे दिसून आले. यावेळी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि पोलीसांनी एकमेंकांकडे बोट दाखवत एकमेकांवर तोंड सुख घेतले. दुसरीकडे लसीकरणात (Vaccination) गाव पुढारी यांचा विनाकारण हस्तक्षेप असल्याने गोंधळ (Confusion) होत असल्याचे शासकीय यंत्रणांचे म्हणणे आहे.

मात्र, या गोंधळात (Confusion) आरोग्य कर्मचारी (Department of Health) व लाभार्थी हे भरडले जात आहेत. सुपा (Supa) येथे आतापर्यंत बहुतांशी वेळा लसीकरणा दरम्यान गोंधळ (Confusion) झालेला आहे. यात नागरिकांच्या मते हे प्रशासकीय काम असताना येथे राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे शिस्त बिघडते व पुढील सर्वच बिघडते. तर नागरिक ही तपासणी टेबल, नोंदणी ठिकाण या ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे.

दरम्यान काल 154 नागरिकांना दुसरा डोस (The Second Dose) तर 301 नागरिकांना प्रथम डोस देण्यात आला. लसीकरणा (Vaccination) आधी नागरिकांची राँपिड चाचणी (Rappid Testing) घेण्यात आली. निगेटिव्ह असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दिर्घ काळाने सुप्यात लसीकरण होत असल्यामुळे सुपा (Supa) येथे मोठी गर्दी होत असून यामुळे नियमित लसीकरण सुरू राहावे आणि राजकीय हस्तक्षेप टाळावा अशी नागरिकांची मागणी आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com