करोना लसीकरण आणि चाचणीचे प्रमाण वाढवा

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या सूचना
करोना लसीकरण आणि चाचणीचे प्रमाण वाढवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी घेतला. कोविड प्रतिबंधक उपाययोजनाबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजा संदर्भात माहिती घेऊन तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण आणि कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.

तालुक्यातील कोविड सेंटरची संख्या वाढवून त्यातील सोयी सुविधांचे नियोजन करावे. लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यावे. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com