COVID19 : जिल्ह्यात करोना संसर्गाचा आकडा 3 हजार 790

तर आज ३ हजार ०२३ रूग्णांना डिस्चार्ज
COVID19 : जिल्ह्यात करोना संसर्गाचा आकडा 3 हजार 790

अहमदनगर l Ahmednagar

जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी करोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. एकाच दिवसात 3 हजार 790 करोना रुग्ण समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा आता दीड लाखांच्या पुढे गेला असून यात 1 लाख 27 हजार रुग्णांनी करोनावर यशस्वी मातही केलेली आहे. जिल्ह्यात करोनातून बरे होण्याची टक्केवारी ही 83.89 टक्के झाली असून यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 22 हजार 802 झाली आहे.

जिल्ह्यात करोनाचा सर्वाधिक प्रभाव हा नगर शहरात असून या ठिकाणी काल 887 करोनाचे नवे रुग्ण सापडलेले आहेत. तर नगर तालुक्यातही 342 जणांना करोना झाला असल्याचे समोर आले आहे. नगर शहर आणि तालुक्यातील करोनाची स्थिती धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यासह राहाता, कर्जत, अकोले, संगमनेर, राहुरी आणि श्रीरामपुर यात तालुक्यात करोना बाधितांचे द्विशतक झाले असून भिंगार, पारनेर, कोपरगाव, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, अन्य जिल्हा आणि पाथर्डीमध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्ण काल समोर आलेले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 861, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 62 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 867 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 110, अकोले 151, जामखेड 25, कर्जत 85, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 15, नेवासा 1, पारनेर 62, पाथर्डी 15, राहता 43, राहुरी 39, संगमनेर 76, शेवगाव 78, श्रीगोंदा 31, श्रीरामपूर 03, कँटोन्मेंट बोर्ड 90 आणि मिलिटरी हॉस्पिटल 9 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 426, अकोले 19, जामखेड 6, कर्जत 2, कोपरगाव 64, नगर ग्रामीण 87, नेवासा 21, पारनेर 18, पाथर्डी 7, राहाता 107, राहुरी 38, संगमनेर 70, शेवगाव 4, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 74, कँटोन्मेंट बोर्ड 22 आणि इतर जिल्हा 89 आणि इतर राज्य 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 1 हजार 867 जण बाधित आढळुन आले. मनपा 351, अकोले 63, जामखेड 24, कर्जत 206, कोपरगाव 58, नगर ग्रामीण 240, नेवासा 98, पारनेर 76, पाथर्डी 85, राहाता 152, राहुरी 139, संगमनेर 71, शेवगाव 39 श्रीगोंदा 73, श्रीरामपूर 123, कॅन्टोन्मेंट बोर्ड 54 आणि इतर जिल्हा 15 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच काल नव्याने 32 रुग्णांचे करोनामुळे मृत्यू झाला असून करोना बळींची संख्या आता 1 हजार 721 झाली आहे.

नगर मनपा 887, नगर ग्रामीण 342, राहाता 302, कर्जत 293, अकोले 233, संगमनेर 217, राहुरी 216, श्रीरामपुर 200, भिंगार 166, पारनेर 156, कोपरगाव 146, शेवगाव 121, नेवासा 120, श्रीगोंदा 109, अन्य जिल्हा 108, पाथर्डी 107, जामखेड 55, लष्कर 9, अन्य राज्य 3 आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com