श्रीरामपूर तालुका करोनामुक्त

श्रीरामपूर तालुका करोनामुक्त
करोनामुक्त

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल एकही नवीन करोना रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात ३५ करोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत होते. त्यात करोनातून ५ जणांनी काल करोनावर मात करून ते घरी गेले आहेत. त्यामुळे आता ३० रुग्ण अॅक्टीव्ह असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

सध्या सर्व चित्रपटगृहे चालू आहेत, तसेच शाळा महाविद्यालयेही सुरू झाले आहेत. तसेच आता सर्व प्रकारच्या गाड्याही सुरू झाल्याने करोना पुन्हा वाढला जातो की काय अशी भीती होती.

मात्र काल तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत सुमारे १७८८२ रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com