करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) संख्या वाढत आहे. मात्र आज जिल्ह्यात आढळलेल्या करोना (corona) बाधितांच्या आकड्यात शनिवारच्या तुलनेत घट झाली आहे. आकडेवारीत घाट झाली असली तरीहि नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

आज जिल्ह्यात ७६५ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये ०७ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ४०२ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ३५६ रुग्ण बाधीत आढळले. आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले (Akole) तालुका टॉपवर आला आहे. तर नेहमी शंभरच्या पुढे असलेले संगमनेर (Sangamner), पारनेरची (Parner) आकडेवारी शंभरच्या आत आली आहे.

कुठे, किती रुग्ण?

अकोले - ११८

संगमनेर - ९४

कर्जत - ६९

नगर ग्रामीण - ६२

नेवासा - ५५

पारनेर - ५१

शेवगाव - ४५

कोपरगाव - ४२

राहाता ४२

राहुरी - ४१

पाथर्डी - ३६

श्रीगोंदा - ३४

श्रीरामपूर - २६

नगर शहर - २४

जामखेड - १४

इतर जिल्हा - १०

भिंगार - ०२

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com