COVID-19 : जिल्ह्यात करोना रुग्णवाढीला थोडासा ब्रेक

COVID-19 : जिल्ह्यात करोना रुग्णवाढीला थोडासा ब्रेक

अहमदनगर l Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सोमवारी करोना बाधितांच्या आकड्यात कमालीची घट आली आहे. गेल्या काही दिवसांत दैनदिन 3 ते 4 हजारांच्या टप्प्या बाधित रुग्ण संख्या काल एकदम 2 हजार 123 पर्यंत खाली आहे. मात्र, असे असले तरी काल एकाच दिवसात 57 करोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी आकडेवारीवरून समोर आले.

जिल्ह्यात काल 3 हजार 388 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 60 हजार 686 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.76 टक्के इतके झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 22 हजार 390 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 840, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 875 आणि अँटीजेन चाचणीत 408 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 44, अकोले 262, जामखेड 7, कर्जत 85, नगर ग्रामीण 60, नेवासा 20, पारनेर 59, पाथर्डी 69, राहाता 2, राहुरी 3, संगमनेर 50, शेवगाव 106, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 46, कँटोन्मेंट बोर्ड 18, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 352, अकोले 4, जामखेड 6, कर्जत 13, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 132, नेवासा 21, पारनेर 23, पाथर्डी 10, राहाता 110, राहुरी 24, संगमनेर 29, शेवगाव 19, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 60, कँटोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 19 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 408 जण बाधित आढळुन आले. मनपा 30, अकोले 01, जामखेड 02, कर्जत 03, कोपरगाव 66, नगर ग्रामीण 05, नेवासा 34, पारनेर 52, पाथर्डी 17, राहाता 09, राहुरी 86, संगमनेर 25, शेवगाव 02, श्रीगोंदा 58, श्रीरामपूर 10 आणि इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. रविवारी करोनामुळे 2 हजार 71 रुग्णांचा बळी गेलेला असून त्यात काल 57 ने वाढ झाल्याने करोना बळींची संख्या आता 2 हजार 128 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com