Coronavirus : जिल्ह्यात आज विक्रमी रुग्ण वाढ

Coronavirus : जिल्ह्यात आज विक्रमी रुग्ण वाढ

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक करोना बाधित वाढले. 24 तासात जिल्ह्यात नव्याने 3 हजार 953 नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतच्या बाधितांच्या एकूण आकड्याने 1 लाख 75 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 23 हजारांवर सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासांत 28 बळींची नोंद झाल्याने एकूण बळींची संख्या 1 हजार 993 वर पोहचली.

जिल्ह्यात काल 3 हजार 148 रुग्णांना रुग्णालयातून घरू सोडण्यात आले. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 49 हजार 806 झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.58 टक्के आहे. 23 हजार 241 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 567, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 505 आणि अँटीजेन चाचणीत 881 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 111, अकोले 114, जामखेड 153, कर्जत 88, कोपरगाव 85, नगर ग्रामीण 136, नेवासा 76, पारनेर 112, पाथर्डी 21, राहता 47, राहुरी 104, संगमनेर 172, शेवगाव 130, श्रीगोंदा 74, श्रीरामपूर 58, कँटोन्मेंट बोर्ड 52, मिलिटरी हॉस्पिटल 25 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com