COVID19 : जिल्ह्यात आज तीन हजार ३२८ रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
COVID19 : जिल्ह्यात आज तीन हजार ३२८ रुग्णांची नोंद

अहमदनगर l Ahmednagar

जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी सलग दुसर्‍या दिवशी चार हजारांच्या आत राहिली. तसेच दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा करोनातून मुक्त होणार्‍यांची संख्या अधिक असल्याने करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. रविवारच्या बाधितांमध्ये नगर शहर, नगर ग्रामीण, शेवगाव, राहाता तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले.

जिल्ह्यात काल 3 हजार 799 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 81 हजार 085 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.51 टक्के इतके झाले आहे. काल नव्याने 3 हजार 327 नवे रूग्णांना करोना संसर्गाचे निदान झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 25 हजार 928 इतकी झाली आहे.

COVID19 : जिल्ह्यात आज तीन हजार ३२८ रुग्णांची नोंद
तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या 'फॅमिली डॉक्टर्स'वर मोठी जबाबदारी

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्टलॅबमध्ये 1 हजार 220, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 415 आणि अँटीजेन चाचणीत 692 रुग्ण बाधीत आढळले. करोनामुळे काल 19 रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतपर्यंत दोन हजार 301 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयानुसार मनपा 65, अकोले 22, जामखेड 221, कर्जत 53, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 97, नेवासा 99, पारनेर 78, पाथर्डी 103, राहता 21, राहुरी 13, संगमनेर 19, शेवगाव 269, श्रीगोंदा 73, श्रीरामपूर 30, कँटोन्मेंट बोर्ड 13 आणि इतर जिल्हा 26 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेनुसार मनपा 277, अकोले 30, जामखेड 5, कर्जत 13, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 199, नेवासा 73, पारनेर 57, पाथर्डी 21, राहाता 246, राहुरी 57, संगमनेर 158, शेवगाव 33, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 99, कँटोन्मेंट बोर्ड 11 आणि इतर जिल्हा 34 आणि इतर राज्य 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 692 जण बाधित आढळुन आले. मनपा 79, अकोले 1, जामखेड 49, कर्जत 43, कोपरगाव 42, नगर ग्रामीण 46, नेवासा 41, पारनेर 61, पाथर्डी 51, राहाता 29, राहुरी 103, संगमनेर 13, शेवगाव 25 श्रीगोंदा 64, श्रीरामपूर 37, कँटोन्मेंट 2 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

असे आहेत रविवारचे बाधित

नगर 421, नगर ग्रामीण 342, शेवगाव 327, राहाता 296, संगमनेर 190, श्रीरामपूर 167, नेवासा 213, पाथर्डी 175, अकोले 53, कोपरगाव 128, कर्जत 109, पारनेर 196, राहुरी 173, भिंगार 26, जामखेड 275, श्रीगोंदा 167, इतर जिल्हा 66, अन्य राज्य 4.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com