Coronavirus : जिल्ह्यात 32 मृत्यूंसह 3176 करोनाग्रस्त वाढले
कराेना रुग्ण

Coronavirus : जिल्ह्यात 32 मृत्यूंसह 3176 करोनाग्रस्त वाढले

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात आज ३०६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २४ हजार ६९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१७६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ०६८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 528, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 434 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 214 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 73, अकोले 81, जामखेड 21, कर्जत 153, कोपरगाव 29, नगर ग्रामीण 4, नेवासा 22, पारनेर 1, पाथर्डी 47, राहता 44, राहुरी 2, शेवगाव 19, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 2, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि मिलिटरी हॉस्पिटल 13 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 462, अकोले 54, जामखेड 4, कर्जत 13, कोपरगाव 78, नगर ग्रामीण 108, नेवासा 33, पारनेर 22, पाथर्डी 46, राहाता 180, राहुरी 52, संगमनेर 199, शेवगाव 23, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 73, कँटोन्मेंट बोर्ड 18 आणि इतर जिल्हा 62 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1 हजार 214 जण बाधित आढळुन आले. मनपा 80, अकोले 62, जामखेड 41, कर्जत 170, कोपरगाव 71, नगर ग्रामीण 111, नेवासा 83, पारनेर 22, पाथर्डी 48, राहाता 78, राहुरी 104, संगमनेर 27, शेवगाव 96 श्रीगोंदा 112, श्रीरामपूर 99, कॅन्टोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी जिल्ह्यात करोनामुळे 1 हजार 656 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात गुरूवारी वाढ होवून हा आकडा 1 हजार 688 झाला आहे.

नगर मनपा 615, कर्जत 336, राहाता 302, संगमनेर 226, नगर ग्रामीण 223, अकोले 197, कोपरगाव 178, श्रीरामपूर 174, राहुरी 158, पाथर्डी 141, शेवगाव 138, नेवासा 138, श्रीगोंदा 128, अन्य जिल्हा 70, जामखेड 66, पारनेर 45, भिंगार 26, लष्कार रुग्णालय 13, अन्य राज्य 2 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com