चिंता वाढली! जिल्ह्यात आजही ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

नगर शहरासह 'या' तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
चिंता वाढली! जिल्ह्यात आजही ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
करोना अपडेट

अहमदनगर | Ahmednagar

नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. जिल्ह्यात आजही तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ०५६ इतके करोनाबाधित आढळून आले आहे. नगर शहर व ग्रामीणसह, राहाता, कर्जत या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ८३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५२५ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार ६९६ रुग्ण बाधीत आढळले

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

नगर मनपा - ७३०

राहाता - २८५

नगर ग्रामीण - २७३

कर्जत - १९९

श्रीरामपूर - १७८

संगमनेर - १६८

कोपरगाव - १६६

नेवासा - १५५

शेवगाव - १४९

पाथर्डी - १४४

राहुरी - १४०

पारनेर - १२८

अकोले - ११५

कॉंटेन्मेन्ट बोर्ड - ९१

श्रीगोंदा - ६१

जामखेड - ४६

इतर जिल्हा - २८

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com