जिल्ह्यात करोनाचा कहर; एकाच दिवशी ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण

नगर शहरासह 'या' तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात करोनाचा कहर; एकाच दिवशी ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ०९७ इतके उच्चांकी करोनाबाधित आढळून आले आहे. नगर शहरासह, राहता, संगमनेर, पाथर्डी या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ८७१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८२९ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार ३९७ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

नगर मनपा - ६७५

राहता - ३५२

संगमनेर - २६७

पाथर्डी - १९५

कर्जत - १९०

कोपरगाव - १७७

नगर ग्रामीण - १६९

श्रीरामपूर - १६५

अकोले - १४७

नेवासा - १३४

पारनेर - १३३

शेवगाव - ११४

राहुरी - १०७

श्रीगोंदा - १०७

जामखेड - ७९

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ४६

इतर जिल्हा - २७

मिलिटरी हॉस्पिटल - १०

इतर राज्य - ०३

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com