चिंताजनक! जिल्ह्यात 32 रूग्णांचा मृत्यू तर 2404 रूग्णांची वाढ

9 तालुक्यात उद्रेक
चिंताजनक! जिल्ह्यात 32 रूग्णांचा मृत्यू तर 2404 रूग्णांची वाढ

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाची स्थिती आता स्फोटकच होतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत दररोज 2 हजारांच्या पुढे नव्याने करोना बाधित रुग्णसमोर येत आहेत.

यामुळे जिल्ह्यात करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या साडे पंधरा हजारांच्या पुढे गेली आहे. यासह नगर शहर, कोपरगाव, कर्जत, राहाता, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, अकोले, पारनेर आणि राहुरी या ताालुक्यात मोठ्या संख्याने करोना रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्याने करोनामुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी आकडेवारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात काल 1 हजार 120 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 6 हजार 221 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 86.29 टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. दरम्यान, काल नव्याने 2 हजार 405 करोना रुग्ण वाढले असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 15 हजार 517 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 556, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 517 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 352 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 147, अकोले 35, जामखेड 2, कर्जत 104, कोपरगाव 53, नगर ग्रामीण 5, नेवासा 21, पारनेर 26, पाथर्डी 18, राहता 31, राहुरी 15, संगमनेर 3, शेवगाव 65, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 4, कँटोन्मेंट बोर्ड 23, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 196, अकोले 7, जामखेड 1, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 28, नेवासा 2, पारनेर 10, पाथर्डी 04, राहाता 96, राहुरी 12, संगमनेर 88, शेवगाव 4, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 17, कँटोन्मेंट बोर्ड 13 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1 हजार 332 जण बाधित आढळुन आले. मनपा 151, अकोले 84, जामखेड 6, कर्जत 175, कोपरगाव 215, नगर ग्रामीण 55, नेवासा 24, पारनेर 85, पाथर्डी 155, राहाता 57, राहुरी 90, संगमनेर 45, शेवगाव 99, श्रीगोंदा 36, श्रीरामपूर 45, कॅन्टोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात करोनामुळे 1 हजार 334 व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात बुधवारी 32 ने वाढ झाली असून आता जिल्ह्यातील करोना बळींची संख्या आता 1 हजार 366 झाली आहे.

आजचा करोना

नगर शहर 494, कोपरगाव 289, कर्जत 279, राहाता 184, पाथर्डी 177, शेवगाव 168, संगमनेर 136, अकोले 126, पारनेर 121, राहुरी 117, नगर ग्रामीण 88, श्रीरामपूर 66, श्रीगोंदा 52, नेवासा 47, भिंगार 40, अन्य जिल्हा 11, जामखेड 9, लष्कर रुग्णालय 1 असे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com